‘आम्हाला तुम्ही काय समजता, आम्ही काय शेड्युल्ड कास्ट आहोत?’
अलीकडे जात सोडल्याचा दावा करणाऱ्यांची आणि आंतरजातीय विवाह करणाऱ्यांची संख्या अलीकडे वाढत आहे, हे खरे! मात्र जन्मापासून मरेपर्यंत आणि खाण्या-पिण्याच्या सवयीपासून वेशभूषेच्या पद्धतीपर्यंत जातीचे संस्कार घडत असल्याने त्याच्या खुणा कळत-नकळत मिरवल्या जातातच. त्या मिटवण्याचा प्रयत्न करण्याची, जातीचा अहंगड दूर करण्याची आणि स्वतःच्या धर्माकडे आणि जातीकडे तटस्थतेने पाहण्याची गरज आहे.......